शारीरिक शिक्षण आणि तंत्रज्ञान
शारीरिक शिक्षण आणि खेळ हा विषय शिकवताना शिक्षक हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना नावीन्यपूर्ण पद्धती व विविध शैलींचा वापर करून अशाप्रकारे अध्यापन उच्च दर्जाचे होईल याबद्दल प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस शालेय शिक्षण आणि खेळ हा विषय सुद्धा खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने व दर्जेदार उपक्रमांद्वारे शिकवण्याचा शिक्षक प्रयत्न करत असतो. शारीरिक शिक्षकांचा या प्रयत्नाला जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर या विषयाला अजून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहचवता येईल. असे म्हणले जाते की आजकाल हार्डवर्क बरोबरच स्मार्टवर्कला सुद्धा जास्त महत्त्व द्यावे.
सर्व शारीरिक शिक्षकांना उपलब्ध तंत्रज्ञान यांची ओळख करून देऊन, त्यांना हे तंत्रज्ञान यांच्या नियमित अध्यापनामध्ये वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी तसेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्यापन प्रभावी होण्यास जास्त तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते अशा सर्व तंत्रज्ञानाची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून संकलित करून पुढे मांडण्यात आली आहे.
सध्या च्या युगात फ्लिप्प्ड क्लासरूम (flipped classroom) या पद्धतीचा वापर सर्व प्रकारच्या विषयांच्या अध्यापनामध्ये होताना दिसून येत आहे. यामध्ये तंत्रज्ञान व अध्यापन शैली याचा ताळमेळ घालून अध्यापन केले जाते. यासाठी शिक्षक स्वतःचे शिकवण्याच्या बाबींचा व्हिडिओज तयार करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमांमधून उपलब्ध करून देतात किंवा इतर काही उपलब्ध व्हिडीओस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात जेणेकरून त्याचा अभ्यास करून विद्यार्थी तासाला आल्यानंतर त्या विषयासंदर्भात अजून ज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना देतो. याबरोबरच शिक्षक वेगवेगळ्या मूल्यमापन प्रक्रिया तंत्रज्ञानाद्वारेच पूर्ण करतो. यासाठी शिक्षकांना स्वतःचे व्हिडिओ तयार करणे, योग्य पद्धतीत ते संपादित (edit) करणे जमले पाहिजे. या यासाठी पुढील तंत्रज्ञानाचा वापर शारीरिक शिक्षण शिक्षक करू शकतो.
व्हिडिओ तयार करणे व संपादित (edit ) करणे
Microsoft Powerpoint: सर्वांनाच माहीत असलेले व सादरीकरणासाठी प्रचलित असलेले हे तंत्रज्ञान खरंतर खूप प्रभावीपणे अध्यापनासाठी वापरता येते. फक्त सादरीकरण करण्यासाठी यांचा वापर मर्यादित नसून यापासून ॲनिमेटेड टेक्स्ट (लिखाण), GIF किंवा ॲनिमेटेड चित्र व काही व्हिडिओज चा वापर करून शिक्षक स्वतःला खूप चांगला माहितीपट (videos) तयार करू शकतात. तसेच याचा वापर करून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दर्जेदार साहित्य पीडीएफ च्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतात.
OBS (Open Broadcast Studio): या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण तयार केलेल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशन पासून आपल्या आवाजात माहिती सादर करून व्हिडीओ तयार करू शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी काही प्रशिक्षण व्हिडिओज सुद्धा या सॉफ्टवेअरच्या मदत मदतीने तयार येतात. हे सॉफ्टवेअर पूर्णतः मोफत उपलब्ध आहे व वापरण्यास सुद्धा सहज सोपे आहे.
Zoom: ऑनलाइन अध्यापन यांबरोबरच जोम या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण खूप दर्जेदार व्हिडिओज तयार करू शकतो.
Camtasia, Filmora 9: व्हिडिओ तयार केल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने संपादन (edit) करायचे असेल तर या सॉफ्टवेअरचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. ही दोन्ही सॉफ्टवेअर हाताळण्यास सहज व सोपी आहेत. लॅपटॉप व कम्प्युटरच्या सहाय्याने याचा वापर करता येतो. फक्त मोबाईलचा वापर करून सुद्धा आपल्याला सहज व सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार करता येतात. या यासाठी पुढे एप्लीकेशन अप्लिकेशन चा वापर करता येईल.
Mobile: kinemaster, filmora go, Filmix, V recorder, Power director, Viva video, Screen recorder, Simple video
Online Lectures:
Google meet
Zoom
Cisco Webex
Microsoft Teams
Educational Web tools
एखाद्या वर्गाचा किंवा खेळातील संघाचा विशिष्ट गट एकत्र ठेवून जर त्यांना अध्यापन करायचे असल्यास व त्यांच्यापर्यंत विविध माहिती ची साधने पोचवायचे असल्यास पुढील दोन तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करता येतो.
Google classroom
Edmodo
दोन्ही तंत्रज्ञाने हाताळण्यास खूप सहज व सोपी आहेत. या प्रकारची सॉफ्टवेअरर्स, शिक्षकाने तयार केलेल्या विशिष्ट गटासाठी, एक विशिष्ट कोड तयार करतात व विद्यार्थी त्यामार्फत शिक्षकाने तयार केलेल्या गटात सामील होऊ शकतात. या दोन्ही सॉफ्टवेअर मार्फत शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत विविध अध्यापन साहित्य पोहोचवू शकतो तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करू शकतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने असाइनमेंट देऊन त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ शकतो.
Wearable Technology
पेडो मिटर, स्मार्ट वॉच, स्मार्ट शूज, स्मार्ट रोप, स्मार्ट शॉर्ट अशा कित्येक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक हालचालींचे विश्लेषण शिक्षक सहजपणे करू शकतात.
मूल्यमापन:
अध्यापन मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मूल्यमापन. विद्यार्थ्यांचे वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करणे अपेक्षित असते. यासाठी जर शारीरिक शिक्षण शिक्षकांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ही प्रक्रिया सहज व सोपी तसेच आनंददायी होऊ शकते. यासाठी पुढील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक करू शकतात. ही तंत्रज्ञान वापरण्यास खूपच सोपी असून थोड्या सरावाने यावर पूर्ण प्रभुत्व मिळवता येते.
Google form
Test you
Edupuzzle
Socrative
Plickers
See Saw
Kahoot
Easy Rubric
Nearpod
मोबाईल ऍप्लिकेशन्स:
Fitness blender, Sweat Deck आणि Swor it - विद्यार्थ्यांसाठी फिटनेस वेगवेगळ्या व्यायाम प्रकारचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त
Balance It - जिमनस्टिक्स मधील विविध कौशल्यांची टास्क कार्डस एप्लिकेशन्स मध्ये उपलब्ध असून याचा वापर करून ही कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येतात.
FIT Radio - शिकवताना वेगवेगळ्या गरजेचे असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे म्युझिक ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत.
PE Shake, Team Shake - वर्गातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या गटांमध्ये नियोजन करण्यासाठी हे ॲप्लिकेशन मदत करते.
Seesaw - विद्यार्थी स्वतःचे डिजिटल पोर्टफोलिओ तयार करून शिक्षकांना बरोबर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर करू शकतात तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे समन्वय या अप्लिकेशन मध्ये करता येते.
FitBreak app: फन आणि फिटनेस संदर्भातील वेगवेगळ्या उपक्रमांची यामध्ये माहिती मिळते.
AR Runner आणि Classroom Roulette (ios): दोन्ही एप्लिकेशन्स फक्त आयफोन साठी उपलब्ध असून खूपच चांगल्या इंटरॅक्टिव्ह पद्धतीने विद्यार्थ्यांकडून शारीरिक उपक्रम करून घेता येतात.
Jump it - दोरीवरच्या उड्यांचे चे वेगवेगळे प्रकार या ॲप्लिकेशन मध्ये उपलब्ध असून ते पाहून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने दोरीवरच्या उड्या करू शकतात.
Class Break - टीम बिल्डींग किंवा आईस ब्रेकिंग चे विविध खेळ या एप्लीकेशन द्वारे माहिती करून घेता येतात.
Beep Fitness Test: विद्यार्थ्यांच्या रुधिराभिसरण दमदारपणा चे मूल्यमापन करण्यासाठी उपलब्ध बीप टेस्ट या ॲप्लीकेशन द्वारे राबवता करता येते. याच बरोबर 12 min Run Test हे ॲप्लिकेशन सुद्धा उपलब्ध आहे.
Decide Now (Fitness Bingo) - Bingo खेळाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये समाविष्ट करून घेता येते.
Video Delay (Video Delay Instant Replay) - आयफोन साठी उपलब्ध असलेले हे ॲप विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचे त्यांना आकलन होण्यासाठी मदत करते. विद्यार्थी कौशल्य करत असताना त्याचा व्हिडिओ साधारण दहा ते पंधरा सेकंद उशीर (delay) करून रेकॉर्ड करते त्यामुळे विद्यार्थ्याला कौशल्य केल्याबरोबर त्याचे वैयक्तिक रेकॉर्डिंग सहजपणे बघता येते. या ॲप्लिकेशनच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थी स्वतःचे कौशल्य पूर्ण करून स्वतःचा व्हिडिओ बघून पुन्हा कौशल्य करण्यासाठी जाऊ शकतो व स्वतःच्या चुका समजून घेऊ शकतो.
Hudl Technique - विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे व्हिडिओ यात रेकॉर्ड करून यांना कौशल्य दरम्यान च्या प्रत्येक परिस्थितीचे ज्ञान देण्यासाठी व जीव यांत्रिकी शास्त्राचा वापर करून त्यांचे कौशल्य उंचावण्यासाठी या अप्लिकेशन चा वापर होतो.
Slo Pro: विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा स्लोमोशन मधील व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना त्यांच्या शरीराची स्थिती तसेच योग्य प्रकारे कौशल्य करण्याच्या क्लूप्त्यांचे ज्ञान देऊ शकतो.
Sporfie (multi angle Video): एप्लीकेशन विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचे एकाच वेळी विविध angle मधून व्हिडिओ दाखवते.
पेडो मिटर: यासारख्या मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून विद्यार्थी किती वेळ चालला किंवा पळाला, त्याने किती कॅलरीज जाळल्या या सारख्या बाबींचे विश्लेषण सहजपणे करता येते.
मेट्रोनोम: पुश अप्स, सिट अप्स किंवा वेगवेगळ्या स्टेप टेस्ट साठी लागणारे कॅडन्स (बीप) या एप्लीकेशन द्वारे वापरून या सर्व कसोट्या प्रभावीपणे राबवता येतात.
Posture Correction: चालताना, बसताना, उभे राहताना किंवा विविध बाबिन मध्ये गरजेची असलेली शरीरधारणा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी या सारखी एप्लिकेशन्स उपयुक्त ठरतात.
Google Apps: विद्यार्थ्यांची माहिती, त्यांच्या विविध कसोट्यांचे स्कोर्स संग्रहीत करण्यासाठी तसेच त्यावर सहज प्रक्रिया करून विविध प्रकारे मूल्यमापन करण्यासाठी गुगलच्या या ॲप्लिकेशनचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो.
Google Drive
Google Docs
Google Slides
Google Sheets
Communication: विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यासाठी पुढील मोबाईल ॲप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करता येतो.
WhatsApp
Telegram
FB group
YouTube channel (private)
No comments:
Post a Comment