Friday, December 16, 2022

मूल्यमापनाची तत्वे



शिक्षणामध्ये एक प्रभावी मूल्यमापन प्रक्रिया राबवायची असल्यास सर्व प्रकारच्या मूल्यमापन पद्धतींचा वापर करणे आवश्यक असल्याचे दिसून येते. शारीरिक सुदृढतेच्या कसोट्या, कौशल्य कसोट्या यांचा वापर करून अकारिक मुल्यमापन,  संकलित मुल्यमापन, कृती मूल्यमापन, परिणाम मूल्यमापन या सर्व मूल्यमापन प्रक्रियांचा अंतर्भाव करून विद्यार्थ्यांचे कौशल्य, आरोग्य, सुदृढता म्हणजेच शारीरिक शिक्षणातील विविध पैलूंचे मूल्यमापन सर्वांकष पद्धतीने झाले पाहिजे.

परंतु या सर्व बाबींसोबतच एक महत्त्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षण शिक्षकाला असलेले मूल्यमापन पद्धतीचे ज्ञान व तो कशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने या मूल्यमापन प्रक्रियेचा अवलंबन करतो यावर या मूल्यमापन प्रक्रियेच्या प्रभावीपणा ठरतो.

शारीरिक शिक्षणातील मूल्यमापन प्रक्रिया ही विशिष्ट तत्त्वांवर अवलंबून असते. प्रत्येक शारीरिक शिक्षकाने या तत्त्वांचा वापर केल्यास मूल्यमापन प्रक्रिया सहज व सोपी होतेच पण त्याबरोबर ती प्रभावीपणे राबविण्यात सुद्धा मदत होते.

मूल्यमापनाची तत्वे ही शारीरिक शिक्षण शिक्षकाला मूल्यमापन प्रक्रिया विशिष्ट उद्देशानुसार तसेच एक क्रमप्राप्त स्वरूपात राबवण्यास मदत करतात.

1. उद्दिष्टे प्रस्थापीत करणे:

जोपर्यंत महत्त्वाची उद्दिष्टे आणि दिशा ठरवल्या जात नाहीत तोपर्यंत शारीरिक शिक्षणात मूल्यमापनाचे स्थान निश्चित केले जाऊ शकत नाही.

उद्दिष्टे शिकण्याचे परिणाम साध्य करतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. उद्दिष्टे महत्वाची आहेत आणि अध्यापन/अध्ययन प्रक्रिया प्रभावी बनवतात. ते शिक्षकांना काय शिकवायचे हे जाणून घेण्यास आणि विद्यार्थ्याला काय शिकायचे आणि साध्य करायचे हे जाणून घेण्यास मदत करते.

मूल्यमापनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी, अध्यापन व अध्यायनातील बदल ओळखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अर्थ लावण्यासाठी उद्दिष्टांचे विश्लेषण विशिष्ट परिणामांमध्ये केले जाणे आवश्यक आहे जे सहसा ज्ञान किंवा वर्तन  क्षमतेच्या संदर्भात मांडले जातात.

2. मूल्यांकनाची प्रक्रिया निश्चित करणे:

केवळ चाचण्या घेणे आणि मोजमाप नोंदवणे (स्कोअर) हे मूल्यांकनाचा शेवट नाही. ज्या उद्दिष्टांसाठी मूल्यमापनाची योजना आखण्यात आली होती ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मूल्यमापनाची प्रक्रिया निश्चित करणे ही शारीरिक शिक्षकाची पहिली जबाबदारी आहे.

3. प्रक्रिया स्थापित करणे:

शारीरिक शिक्षणाने त्याच्या प्रक्रियेचे नियोजन केले पाहिजे जेणेकरून उद्दिष्टांमधून प्रकट झालेली मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतील. प्रक्रिया विकास 2 गोष्टींच्या प्रकाशात होतो: उत्पादनाच्या गरजा ज्या निर्धारित केल्या आहेत आणि संदर्भ बिंदू (लक्ष्ये) स्थापित केले आहेत. मापन तंत्र प्रक्रियेच्या प्रक्रियेशी जवळून संबंधित आहे. किंबहुना, व्यापकपणे सांगायचे तर, ही त्यापैकी एक प्रक्रिया आहे. इच्छित उत्पादन साध्य करण्यासाठी प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी मापन अपरिहार्य आहे; ते त्या उत्पादनाची स्थिती आणि प्रगती ठरवण्यासाठी देखील अपरिहार्य आहे. प्रभावी मूल्यमापन अपेक्षित असल्यास चांगली प्रक्रिया आवश्यक आहे.

4. कृती मूल्यमापन आणि परिणाम मूल्यमापन या दोन्ही मार्फत माहिती गोळा करणे:

मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कोणतीही कसोटी राबवताना व त्या मार्फत कोणतीही माहिती मिळवताना म्हणजेच मापन मिळवताना कृती मूल्यमापन व परिणाम मूल्यमापन हे दोन्हीही एकदम प्रभावी मानले जाणारे जाणारी तंत्रे आहेत. याचाच अर्थ असा की जेव्हा जेव्हा आपल्याला गुणात्मक रित्या किंवा संख्यात्मकरीत्या माहिती हवी असल्यास आपल्याला या दोन्ही तंत्राचा म्हणजेच परिणाम मूल्यमापन व प्रति मूल्यमापनाचा वापर करावा लागतो.

5. व्यक्तिनिष्ठ मापन:

मूल्यमापन करताना नेहमी वस्तुनिष्ठ कसोट्यांचाच वापर केला पाहिजे असा बऱ्याच जणांमध्ये एक समज असतो. परंतु बऱ्याच वेळा वस्तुनिष्ठ कसोट्यांपेक्षाही व्यक्तीनिष्ठ कसोट्यांचा वापर करून केलेले मूल्यमापन अधिक सरस ठरू शकते. म्हणूनच मूल्यमापन करताना वस्तुनिष्ठ कसोट्यांबरोबरच व्यक्तीनिष्ठ कसोट्याही वापरल्या पाहिजेत. मूल्यमापन करताना जर आपण वस्तुनिष्ठ व्यक्तीनिष्ठ या दोन्ही पद्धतींचा समावेश करून मूल्यमापन केल्यास मूल्यमापन प्रक्रिया अधिक प्रभावी ठरण्यास मदत होते मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढते.

6. तज्ञ व्यक्तींमार्फत कसोटीचे व्यवस्थापन
मूल्यमापन प्रक्रिया राबवत असताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राबवलेल्या कसोटीमार्फत चांगल्या दर्जाच्या माहितीची नोंद करून घेणे. याचाच अर्थ असा की चांगल्या दर्जाची माहिती मिळवायची असल्यास ज्या व्यक्तींना मूल्यमापन प्रक्रियेचा अनुभव आहे किंवा ते या प्रक्रियेमध्ये जाणकार/ ज्ञानी आहेत अशा व्यक्तींमार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करून घेणे महत्त्वाचे ठरते.
जेव्हा विद्यार्थी संख्या किंवा कसोट्यांची संख्या जास्त असते व मूल्यमापन प्रक्रिया कदाचित जास्त वेळ खाऊ होऊ शकते अशा वेळेस तज्ञ लोकांची मदत घेतल्यास चांगल्या दर्जा आणि मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करता येते.
i. सहाय्यक व्यक्तींना कसोटीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्यांची अचूक माहिती असणे आवश्यक आहे
ii. कसोट्यांची गुणदान कशा पद्धतीत आहे व त्याचे अचूक नोंद कशी करावी याचे ज्ञान अशा व्यक्तींना असणे गरजेचे आहे.
iii. तज्ञ व्यक्तीं मध्ये परिणाम व कृती मूल्यमापन दोन्ही पद्धतीत मूल्यमापन प्रक्रिया राबवण्यामध्ये सहजता असली पाहिजे.
iv. सहाय्यक व्यक्तींना मानकांवर आधारित किंवा निकषांवर आधारित मूल्यमापन कशा पद्धतीने करावे याचे सुद्धा अचूक ज्ञान असणे गरजेचे आहे.

Monday, December 12, 2022

स्व: आणि सहका-याचे मुल्यमापन



स्व: आणि सहका-याचे मुल्यमापन

ब-याच वेळा पारंपारिक मूल्यमापनाला बाजूला ठेवून इतर पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते ज्यालाच आपण Authentic Evaluation म्हणजेच सत्य मूल्यमापन असे म्हणतो.

अशा प्रकारच्या मूल्यमापनामध्ये गटचर्चा, प्रकल्प, प्रदर्शन , मुलाखत इत्यादी बाबींचा समावेश होतो. अशा सर्व बाबींचे मूल्यमापन करत असताना एक प्रभावी मूल्यमापन पद्धत म्हणून स्व: आणि सहका-याचे मूल्यमापन वापरले जाते.

जेव्हा विद्यार्थी स्वतः मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी झालेले असतात तेव्हा गटकार्य अधिक यशस्वी होऊ शकते. अशा प्रकारची मूल्यमापन पद्धती राबवत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्यमापनाचे निकष व्यवस्थित समजावून देणे व मूल्यमापन निकष प्रस्थापित करत असताना विद्यार्थ्यांशी सल्ला मसलत करणे आवश्यक असते.

विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने मूल्यमापन करत असताना सर्व विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे तसेच विविध पैलूंचे चांगल्या दर्जाने मूल्यमापन होईल अशा पद्धतीने निकष ठरवणे गरजेचे असते.

स्व: आणि सहका-याचे मुल्यमापनाचे मुख्य उद्दिष्टे:

विद्यार्थ्यांची गटकार्य करत असतानाची स्वतःची जबाबदारी व स्वायत्तता वाढवण्यासाठी या प्रकारच्या मूल्यमापनाचे महत्त्व जास्त असते.

मूल्यमापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी स्वतः अंतर्भूत असल्या कारणाने विषय कौशल्य आणि प्रक्रिया अधिक प्रगतपणे आणि सखोलपणे समजून घेण्यासाठी विद्यार्थी सतत प्रयत्न करत असताना दिसतात.

विद्यार्थी गटचर्चा मध्ये व्यवस्थित सहभागी होतात व गटचर्चा दरम्यान गांभीर्याने चिंतनात सामील होतात.

विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या विषय किंवा आशयाच्या समजून घेण्याच्या पद्धतीची व निर्णय घेण्याची चांगली समज विकसित होते.

विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान किती चांगले आहे किंवा ते कोणत्या आशयामध्ये कमी पडतात याबद्दल त्यांना जाणीव होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये नक्की कुठल्या आशयावर जास्त लक्ष केंद्रित करायची गरज आहे तसेच जी काही उद्दिष्टे ते स्वतःसाठी तयार करतात ती वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न करतात.

सहकार्याचे मूल्यमापन करताना गटामधील सर्व विद्यार्थ्यांना मूल्यमापनाची प्रक्रिया व निकष आधीच समजावलेले असतात. गटातील सर्वच विद्यार्थी एकमेकांना गुणदान करतात व सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी करून प्रत्येक विद्यार्थ्याला गुण दिले जातात.

स्व: आणि सहका-याचे मुल्यमापनाचे फायदे:

·  गटामधील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाचे गुणदान करत असल्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया निष्पक्षपातीपणे पूर्ण होण्यास मदत होते.

·       विद्यार्थी मूल्यमापनामध्ये जबाबदारीने सहभागी होतो व व गांभीर्याने मूल्यमापन करतो.

·    विद्यार्थी स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करत असल्यामुळे त्याला स्वतःतील कमतरता व ज्या आशयामध्ये त्याचे प्रभुत्व आहे अशा बाबी समजून घेण्यास मदत होते.

·       मूल्यमापनाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तो प्रोत्साहितपणे हे कार्य पूर्ण करतो.

·       विद्यार्थ्‍यांना त्यांची भूमिका आणि समूह कार्य प्रक्रियेतील योगदान यावर चिंतन करण्यास प्रोत्साहित करते.

·      अशा प्रकारचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना सहजपणे मान्य होते कारण सर्व मूल्यमापन प्रक्रिया ही त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या सहका-याने मिळून पूर्ण केलेली असते.

·    काही विद्यार्थी जे काम करण्यास टाळाटाळ करतात अशा विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीला आणा बसतो कारण त्यांनी माहीत असते आपल्या कार्यमानाचे हे आपल्या सहकारी विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन केले जाणार आहे.

स्व: आणि सहका-याचे मुल्यमापनाचे तोटे:

·     या प्रकारचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांना पूर्ण निकष समजून देणे तसेच मूल्यमापनाची प्रक्रिया समजावून देणे यामध्ये शिक्षकाचा भरपूर वेळ खर्च होतो त्यामुळे कदाचित लेक्चररचा वर्कलोड वाढू शकतो.

·     या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी पूर्णतः समाविष्ट असल्यामुळे कदाचित या मूल्यमापनाच्या विश्वसहार्यतेच्या संदर्भात काही प्रमाणात जोखीम असू शकते कारण कधी कधी विद्यार्थी स्वतःच्या मित्राला किंवा जवळच्या सहकाऱ्याला जास्त गुणदान करू शकतात.

·       कदाचित विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांना समान गुण देण्याकडे कल असू शकतो.

·    काही विद्यार्थी वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या दबावाखाली असल्यास ते त्यांना योग्य प्रकारे किंवा कमी गुणदान करण्यास घाबरू शकतात किंवा त्यांचा गोंधळ उडू शकतो.

·       मूल्यमापन प्रक्रियेत विशिष्ट गट तयार झाल्यास ते विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे गुणदान मुद्दाम कमी करू शकतात किंवा स्वतःच्या मित्रांना जास्त गुणदान देऊ शकतात

स्वमूल्यमापन व सहकार्याच्या मूल्यमापन या प्रक्रियेमध्ये जरी वेळ जास्त जात असेल किंवा शिक्षकाला मूल्यमापन प्रक्रियेचा भार वाढत असेल तरीही आशयातील एखाद्या तरी घटकासाठी शिक्षकाने अशा प्रकारच्या मूल्यमापन प्रक्रियेचा वापर केला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना मूल्यमापन प्रक्रिया समजण्यास, त्याची गांभीर्याने दखल घेण्यास व स्वतःच्या कौशल्यांच्या /आशयाच्या ज्ञानाच्या दर्जाबद्दल तो चिंतन करू शकतो आणि उपाययोजना राबवून त्यामध्ये तो प्राविण्य संपादित करू शकतो.

स्वमुल्यमापनाचा नमुना














 सहका-याच्या मुल्यमापनाचा नमुना  






Saturday, December 10, 2022

अकारीक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह असेसमेंट) व संकलित मूल्यमापन (समेटिव्ह असेसमेंट)

 


शाळांमध्ये जेव्हाही शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण यामध्ये मूल्यमापन याविषयी चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच दोन प्रकारच्या मूल्यमापनांची चर्चा ही सर्वात जास्त प्रकारे होते ती म्हणजे अकारीक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह असेसमेंट) व संकलित मूल्यमापन (समेटिव्ह असेसमेंट).

सोप्या व सहज प्रकारे सांगायचे झाल्यास अकारिक मूल्यमापन हे एखादा विषय शिकवत असताना विविध प्रकारे विद्यार्थ्यांचे केलेले मूल्यमापन मग ते लेखी परीक्षा ,निरीक्षण,पदनिश्चय श्रेणी, कौशल्य कसोट्या, शारीरिक सुदृढतेच्या कसोट्या किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेले असू शकते. तर संकलित मूल्यमापन म्हणजे पूर्ण विषय संपून झाल्यानंतर त्या विषयावर आधारित घेतलेली अंतिम परीक्षा होय.

दोन्ही मधला फरक एका वाक्यात जरी एवढ्या सहजपणे सांगितला असेल तरीही सुद्धा बऱ्याच लोकांना अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन यामधील फरक स्पष्ट होत नाही. त्यासाठी या दोन्हीही मूल्यमापनामधील फरकांची आपण सविस्तर चर्चा करूयात.

अकारिक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह असेसमेंट)

अध्यापन व अध्ययन प्रक्रिया दरम्यान विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी व विषय सहजपणे विद्यार्थ्यांना कशाप्रकारे समजून सांगावा या संदर्भात शिक्षकाला आधारित मूल्यमापनाचा उपयोग होतो
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचे आणि त्यांच्या कौशल्य तसेच कल्पना या सगळ्या बाबी विचारात घेऊन तुमचे योग्य प्रकारे मूल्यमापन करण्यासाठी अकारिक मूल्यमापन वापरले जाते.

आकारिक मूल्यमापन हे विषय शिकवण्याच्या दरम्यान वापरले जाते याचा अर्थ असा की ते दररोज किंवा आठवड्यात केव्हाही केले जाऊ शकते.  

आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांना शिकवत असताना विद्यार्थी कोणत्या आशयात कमी प्रगती करतात किंवा कोणत्या अशात ते जास्त प्रगती करतात हे समजून घेण्यास मदत होते. म्हणजेच मुलांच्या सुधारण्याच्या क्षेत्रांची ओळख करून घेण्यास शिक्षकांना अकारिक मूल्यमापन मदत करते.

शिक्षकाचे अध्यापन किती चांगल्या दर्जांनी होत आहे किंवा विद्यार्थी किती चांगल्या दर्जाने अध्ययन करत आहे याचा आकारिक मूल्यमापन हा एक प्रकारचा पुरावा असू शकतो.

आकारिक मूल्यमापनावर आधारित मिळालेल्या माहितीवर शिक्षक स्वतःच्या अध्यापनात अमला ग बदल आणू शकतो तसेच विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो व अभिप्राय / प्रत्याभरण देऊ शकतो.  आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्याला स्वतःच्या गरजा व प्रगतीचे उपाय जाणून घेण्यास मदत करते तसेच शिक्षकांना त्याच्या वरील उपाय योजना राबवण्यास मदत करते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य मन दिवसेंदिवस सुधारण्यास मदत करते व एक प्रकारे त्यांना प्रोत्साहित करण्यास या दर्शक ठरते.

संकलित मूल्यमापन (समेटिव्ह असेसमेंट)

संकलित मूल्यमापन हे ठराविक अंतराने होते म्हणजेच जेव्हा आपल्याला मूल्यमापनाची किंवा विद्यार्थ्यांच्या गुणाची औपचारिकपणे नोंद करणे आवश्यक असते तेव्हा संकलित मूल्यमापन केले जाते उदाहरणार्थ वर्ष अखेरीची परीक्षा किंवा सत्रा अखेरची परीक्षा.

संकलित मूल्यमापन हे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान औपचारिक निकषांवर आधारित असते तरीही प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता मोजण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी संकलित मूल्यमापनाचा वापर केला जातो.

विषयाच्या किंवा आशयाच्या सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच वर्षा अखेरीस विद्यार्थ्यांना श्रेणी प्रदान करण्यासाठी किंवा त्यांना त्यांची शिकलेल्या विषयासंदर्भातील एकूण प्रगती समजून देण्यासाठी संकलित मूल्यमापन मदत करते.

शिक्षक संकलित मूल्यमापनाचा वापर विद्यार्थ्यांना श्रेणी प्रदान करण्यासाठी किंवा पुढील टप्प्यामध्ये अध्ययन अजून प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांची पुढच्या वर्गात पदोन्नती करण्यासाठी वापर करतात.

संकलित मूल्यमापन हे विषय संदर्भातील ध्येय व उद्दिष्ट गाठली आहेत की नाही हे दर्शवण्याची तसेच बेंच मार्क (विशिष्ट पद्धतीतील कमीत कमी आवश्यक कार्यमान) पर्यंत विद्यार्थी पोहोचला आहे का नाही हे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.

संकलित मूल्यमापन कशा प्रकारे होणार आहे या सगळ्यांची ओळख विद्यार्थ्यांना विषय शिकवण्याच्या आधीच करून देणे आवश्यक असते. संकलित मूल्यमापन ही अध्यापनाच्या पूर्ण प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया असल्यामुळे यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षक वैयक्तिक रित्या अभिप्राय / प्रत्याभरण देऊ शकत नाही. संकलित मूल्यमापन हे शिकवलेल्या पूर्ण विषयावर आधारित असते.

Thursday, December 8, 2022

व्यक्तिनिष्ठ विरुद्ध वस्तुनिष्ठ कसोट्या

 


व्यक्तिनिष्ठ विरुद्ध वस्तुनिष्ठ कसोट्या

कसोट्या ह्या विद्यार्थ्यांची मानसिक/ शारीरिक क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये, विषय ज्ञान, खेळातील कौशल्य  इत्यादींचे मूल्यमापन करण्याची प्राथमिक आणि मूलभूत पद्धत आहे तसेच विद्यार्थ्याना खेळासाठी/ स्पर्धेसाठी निवडण्याचा  सर्वोत्तम मार्ग आहे. या कसोट्या शिक्षकांना  त्यांचे विद्यार्थी किती हुशार आणि कुशल आहेत हे समजून घेण्यास मदत करतात. 

कसोट्या व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्हीही प्रकारच्या असू शकतात. वस्तुनिष्ठ कसोट्या तांत्रिक कौशल्ये आणि योग्यतेचे मूल्यमापन करतात तर व्यक्तिनिष्ठ कसोट्या विषयांच्या संकल्पनात्मक आकलनाचे मूल्यमापन  करतात. वस्तुनिष्ठ कसोट्या बहु-निवडीच्या स्वरूपाच्या असतात जिथे प्रत्येक प्रश्न निवडण्यासाठी चार अद्वितीय उत्तरांसह येतो, तर व्यक्तिनिष्ठ चाचण्यांमध्ये प्रश्नांमध्ये विचारलेल्या संकल्पनेचे तपशीलवार वर्णन लिहिणे समाविष्ट असते.

शिक्षक वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ कसोट्या घेत असले तरीही  त्यांनी त्यांच्या मूल्यमापन कसोट्या अशा प्रकारे तयार केल्या पाहिजेत की विद्यार्थ्यांकडून आवश्यक असलेल्या सर्व कौशल्यांचे मूल्यमापन करतील.  या कसोट्या फार कठीण किंवा खूप सोप्या नसाव्यात आणि विद्यार्थी प्रश्नांबाबत/कौशल्य संपादन करण्याबाबत कसे विचार करतात आणि त्यांच्याकडे कसे पाहतात याचे मूल्यांकन केले पाहिजे.

शिक्षक निर्मित कसोट्या व प्रमाणित कसोट्या


शिक्षक निर्मित कसोट्या व प्रमाणित कसोट्या
 

काळजीपूर्वक तयार केलेल्या शिक्षक निर्मित कसोट्या आणि प्रमाणित कसोट्या अनेक प्रकारे सारख्या असतात. दोन्ही प्रकारच्या कसोटी ह्या काळजीपूर्वक, नियोजन बद्ध व विशिष्ठ निकषांवर आधारित तयार केलेल्या असतात.  शिक्षक निर्मित कसोट्या व प्रमाणित कसोट्या या दोन्ही विद्यार्थ्याला स्वतःच्या प्रगतीबाबत योग्य प्रकारे दिशादर्शक ठरतात. 

परंतु तरीही दोघांमध्ये फरक आहे. या दोन्ही प्रकारच्या कसोट्या गुणवत्ता, विश्वासार्हताव्यवस्थापन आणि  गुणांकन करण्याच्या कार्यपद्धती यामध्ये भिन्न आहेत. प्रमाणित कसोट्या चांगल्या आणि गुणवत्तेत अधिक सरस, अधिक विश्वासार्ह आणि वैध असतात यात शंका नाही,.

परंतु वर्गशिक्षक नेहमी प्रमाणित कसोट्यावर अवलंबून राहू शकत नाहीत. प्रमाणित कसोट्या शिक्षकांच्या शालेय स्तरावरच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाहीतत्या सहज उपलब्ध  नसत किंवा महाग असू शकतात  व तसेच कदाचित शिक्षकांच्या गरजेपेक्षा त्यांची भिन्न उद्दिष्टे असू शकतात. 

आपण शिकवलेल्या आशयावर आधारित तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यांचे आपण करण्यासाठी, शिक्षकाला स्वतःच्या  कसोट्या तयार कराव्या लागतात, ज्या सामान्यतः वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात.

शिक्षकांनी बनवलेल्या कसोट्या सामान्यत: वर्गातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य आत्मसात करण्याच्या पद्धती तपासण्यासाठी, शिक्षकांनी स्वीकारलेल्या अध्यापन पद्धतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि शाळेच्या इतर अभ्यासक्रम कार्यक्रमांसाठी तयार केल्या जातात.

शिक्षक निर्मित कसोट्या ह्या शिक्षकाच्या हातात असलेले सर्वात मौल्यवान साधन आहे. शिक्षक निर्मित कसोट्या स्थानिक अभ्यासक्रमाचे परिणाम आणि कौशल्य संपादन मोजण्यासाठी तयार केल्या जातात. शिक्षक निर्मित कसोट्या शिक्षकांना ना कसोटी प्रक्रिया गुणांकन व व्यवस्थापन यामध्ये खूप प्रमाणात सहजता प्राप्त करून देतात तसेच त्यांच्या या निर्मितीसाठी कोणत्याही विशेष प्रकारच्याअत्याधुनिक तंत्राची आवश्यकता नसते.