Thursday, December 8, 2022

शिक्षक निर्मित कसोट्या व प्रमाणित कसोट्या


शिक्षक निर्मित कसोट्या व प्रमाणित कसोट्या
 

काळजीपूर्वक तयार केलेल्या शिक्षक निर्मित कसोट्या आणि प्रमाणित कसोट्या अनेक प्रकारे सारख्या असतात. दोन्ही प्रकारच्या कसोटी ह्या काळजीपूर्वक, नियोजन बद्ध व विशिष्ठ निकषांवर आधारित तयार केलेल्या असतात.  शिक्षक निर्मित कसोट्या व प्रमाणित कसोट्या या दोन्ही विद्यार्थ्याला स्वतःच्या प्रगतीबाबत योग्य प्रकारे दिशादर्शक ठरतात. 

परंतु तरीही दोघांमध्ये फरक आहे. या दोन्ही प्रकारच्या कसोट्या गुणवत्ता, विश्वासार्हताव्यवस्थापन आणि  गुणांकन करण्याच्या कार्यपद्धती यामध्ये भिन्न आहेत. प्रमाणित कसोट्या चांगल्या आणि गुणवत्तेत अधिक सरस, अधिक विश्वासार्ह आणि वैध असतात यात शंका नाही,.

परंतु वर्गशिक्षक नेहमी प्रमाणित कसोट्यावर अवलंबून राहू शकत नाहीत. प्रमाणित कसोट्या शिक्षकांच्या शालेय स्तरावरच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाहीतत्या सहज उपलब्ध  नसत किंवा महाग असू शकतात  व तसेच कदाचित शिक्षकांच्या गरजेपेक्षा त्यांची भिन्न उद्दिष्टे असू शकतात. 

आपण शिकवलेल्या आशयावर आधारित तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यांचे आपण करण्यासाठी, शिक्षकाला स्वतःच्या  कसोट्या तयार कराव्या लागतात, ज्या सामान्यतः वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात.

शिक्षकांनी बनवलेल्या कसोट्या सामान्यत: वर्गातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य आत्मसात करण्याच्या पद्धती तपासण्यासाठी, शिक्षकांनी स्वीकारलेल्या अध्यापन पद्धतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि शाळेच्या इतर अभ्यासक्रम कार्यक्रमांसाठी तयार केल्या जातात.

शिक्षक निर्मित कसोट्या ह्या शिक्षकाच्या हातात असलेले सर्वात मौल्यवान साधन आहे. शिक्षक निर्मित कसोट्या स्थानिक अभ्यासक्रमाचे परिणाम आणि कौशल्य संपादन मोजण्यासाठी तयार केल्या जातात. शिक्षक निर्मित कसोट्या शिक्षकांना ना कसोटी प्रक्रिया गुणांकन व व्यवस्थापन यामध्ये खूप प्रमाणात सहजता प्राप्त करून देतात तसेच त्यांच्या या निर्मितीसाठी कोणत्याही विशेष प्रकारच्याअत्याधुनिक तंत्राची आवश्यकता नसते.

शिक्षक निर्मित कसोट्यांची वैशिष्ट्ये:

1. कसोट्यांची प्रक्रिया किंवा त्यातील घटक आशयाच्या क्लिष्टते नुसार मांडल्या जातात.

2. या कसोटयांचा उपयोग आत्मसात केलेले कौशल्य मोजण्यासाठी आणि निदानासाठी केला जाऊ शकतो.

3. शिक्षक निर्मित कसोट्यांचा उपयोग अकारीक मूल्यमापनासाठीचे एक महत्वाचे साधन म्हणून देखील केला जाऊ

    शकतो.

4. या कसोट्यांसाठीची तयारी आणि व्यवस्थापन खुप सहज व खर्चिक दृष्ट्या किफायती दार असते.

5. शिकवलेल्या आशियातील कौशल्यांचे प्राविण्य तपासण्यासाठी शिक्षक निर्मित कसोट्या विकसित केल्या जातात.

6. शिक्षकांनी तयार केलेल्या कसोट्यांचा संशोधनासाठी कमीत कमी वापर केला जातो.

7. शिक्षक निर्मित कसोट्यां मानके तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षक निर्मित कसोट्यांची निर्मीतीची तत्त्वे:

शिक्षक निर्मित कसोट्या सुनियोजितपणे तयार करण्याची  गरज नसते. तरीही त्या मूल्यमापनाचे अधिक कार्यक्षम आणि प्रभावी साधन बनवण्यासाठी, या कसोट्या तयार करताना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक असते.

शिक्षक निर्मित कसोट्यांच्या तयारीसाठी पुढील टप्प्यांचे पालन केले जाऊ शकते:

 i) नियोजन:

शिक्षक निर्मित कसोट्यांच्या नियोजनामध्ये हे समाविष्ट होतो.

अ. परीक्षेचा ध्येय आणि उद्दिष्टे ठरवणे, ‘काय मोजायचे आणि का मोजायचे’.

ब कसोटीचे स्वरुप आणि अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागासाठी हे निश्चित करणे.

क कसोटीची प्रक्रियाही उपलब्ध साहित्य व जागा यांचा विचार करून प्रस्थापित करणे

ड शिकवलेल्या आशयाच्या आवश्यकतेनुसार कसोटी चे स्वरूप सोपे किंवा क्लिष्ठ पद्धतीत ठेवणे

इ. सहकारी शिक्षक, इतर शाळांचे अनुभवी शिक्षक आणि कसोटी तज्ञ यांचे सहकार्य व मार्गदर्शक

   सूचना  मागवल्या चांगल्या दर्जाची कसोटी तयार होऊ शकते.

ii) कसोटीची तयारी:

नियोजन ही कसोटीची तात्विक  बाजू आहे  तर  चांगली तयारी व व्यवस्थापन  ही कसोटीची व्यावहारिक बाजू आहे.  कसोट्या  यातयार करताना सर्व व्यावहारिक बाबी विचारात घ्याव्यात. कसोटी तयार करण्यापूर्वी खूप विचार, पुनर्विचार आणि वाचन आवश्यक आहे. सुट्टी तयार केल्यानंतर इतर  सहकारी शिक्षक किंवा तज्ञांना या कसोट्या पुनरावलोकनासाठी  दिल्या पाहिजेत आणि त्यावर त्यांचे मत जाणून  घेतले पाहिजे. अशा प्रकारे मागवलेल्या सूचना आणि सुट्टी प्रक्रिया व व्यवस्थापनामध्ये पुन्हा बदल करण्यास मदत करतील जेणेकरून ते अधिक स्वीकार्य आणि वापरण्यायोग्य बनतील.

सुट्टी निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य प्रकारे व दर्जेदार कसोटी निर्मिती. तज्ञांकडून योग्य दिशा किंवा सूचना न घेतल्यास कसोटीची विश्वासार्हता गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमजही निर्माण होऊ शकतो.

शिक्षक निर्मित कसोटी तयार करताना खालील बाबींचा दिशादर्शक म्हणून उपयोग होऊ शकतो.  

 (i) कसोटी पूर्ण होण्याची वेळ,

 (ii) प्रत्येक कसोटीला दिलेले गुण,

(iii) कसोटीमधील कौशल्यांच्याआवर्तणांची संख्या, अंतर, वेग ई. बाबिंचा विचार 

(iv) गुणांकन कसे करायचे आणि कशाप्रकारे नोंदवायचेयाचा विचार करावा

(v)  शाळेमध्ये / स्वतःकडे उपलब्ध साहित्य तसेच साधन सामग्री यावरच आधारित शिक्षक निर्मित कसोट्या

      तयार कराव्यात.

शिक्षक निर्मित कसोट्यांचा उपयोग:

1. वर्गातील विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले कौशल्य सामान्य, सरासरी, सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरीपेक्षा कमी आहे हे जाणून घेण्यासाठी शिक्षकास मदत करणे.

2. अध्यापन अधिक सक्षम पणे करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे.

3. विद्यार्थ्यांच्या कौशल्य संपादनाचे मापन करून त्यांच्या अध्ययनातील प्रगतीची दिशा दाखवणे दाखवणे.

4. अध्यापनाची उद्दिष्टे किती चांगल्या प्रकारे पूर्ण झाली हे तपासण्यास शिक्षकास मदत करणे. 

5. शिकण्याच्या अनुभवांची परिणामकारकता जाणून घेणे.

6. विद्यार्थ्यांना शिकण्यात येणाऱ्या अडचणींचे निदान करणे आणि आवश्यक उपाययोजना सुचवणे.

7. गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना श्रेणी देणे किंवा कौशल्य संपादनास त्यांचे वर्गीकरण करणे किंवा त्यांची श्रेणी देणे

8. शिक्षक निर्मित कसोट्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यास शिक्षकांना मदत करू शकतात

9. या कसोट्या अकारिक, निदानात्मक आणि संकलित मूल्यमापनासाठी एक चांगले साधन म्हणून वापरल्या जाऊ  

    शकतात.

 


No comments:

Post a Comment