Saturday, December 10, 2022

अकारीक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह असेसमेंट) व संकलित मूल्यमापन (समेटिव्ह असेसमेंट)

 


शाळांमध्ये जेव्हाही शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण यामध्ये मूल्यमापन याविषयी चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच दोन प्रकारच्या मूल्यमापनांची चर्चा ही सर्वात जास्त प्रकारे होते ती म्हणजे अकारीक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह असेसमेंट) व संकलित मूल्यमापन (समेटिव्ह असेसमेंट).

सोप्या व सहज प्रकारे सांगायचे झाल्यास अकारिक मूल्यमापन हे एखादा विषय शिकवत असताना विविध प्रकारे विद्यार्थ्यांचे केलेले मूल्यमापन मग ते लेखी परीक्षा ,निरीक्षण,पदनिश्चय श्रेणी, कौशल्य कसोट्या, शारीरिक सुदृढतेच्या कसोट्या किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेले असू शकते. तर संकलित मूल्यमापन म्हणजे पूर्ण विषय संपून झाल्यानंतर त्या विषयावर आधारित घेतलेली अंतिम परीक्षा होय.

दोन्ही मधला फरक एका वाक्यात जरी एवढ्या सहजपणे सांगितला असेल तरीही सुद्धा बऱ्याच लोकांना अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन यामधील फरक स्पष्ट होत नाही. त्यासाठी या दोन्हीही मूल्यमापनामधील फरकांची आपण सविस्तर चर्चा करूयात.

अकारिक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह असेसमेंट)

अध्यापन व अध्ययन प्रक्रिया दरम्यान विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी व विषय सहजपणे विद्यार्थ्यांना कशाप्रकारे समजून सांगावा या संदर्भात शिक्षकाला आधारित मूल्यमापनाचा उपयोग होतो
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचे आणि त्यांच्या कौशल्य तसेच कल्पना या सगळ्या बाबी विचारात घेऊन तुमचे योग्य प्रकारे मूल्यमापन करण्यासाठी अकारिक मूल्यमापन वापरले जाते.

आकारिक मूल्यमापन हे विषय शिकवण्याच्या दरम्यान वापरले जाते याचा अर्थ असा की ते दररोज किंवा आठवड्यात केव्हाही केले जाऊ शकते.  

आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांना शिकवत असताना विद्यार्थी कोणत्या आशयात कमी प्रगती करतात किंवा कोणत्या अशात ते जास्त प्रगती करतात हे समजून घेण्यास मदत होते. म्हणजेच मुलांच्या सुधारण्याच्या क्षेत्रांची ओळख करून घेण्यास शिक्षकांना अकारिक मूल्यमापन मदत करते.

शिक्षकाचे अध्यापन किती चांगल्या दर्जांनी होत आहे किंवा विद्यार्थी किती चांगल्या दर्जाने अध्ययन करत आहे याचा आकारिक मूल्यमापन हा एक प्रकारचा पुरावा असू शकतो.

आकारिक मूल्यमापनावर आधारित मिळालेल्या माहितीवर शिक्षक स्वतःच्या अध्यापनात अमला ग बदल आणू शकतो तसेच विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो व अभिप्राय / प्रत्याभरण देऊ शकतो.  आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्याला स्वतःच्या गरजा व प्रगतीचे उपाय जाणून घेण्यास मदत करते तसेच शिक्षकांना त्याच्या वरील उपाय योजना राबवण्यास मदत करते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य मन दिवसेंदिवस सुधारण्यास मदत करते व एक प्रकारे त्यांना प्रोत्साहित करण्यास या दर्शक ठरते.

संकलित मूल्यमापन (समेटिव्ह असेसमेंट)

संकलित मूल्यमापन हे ठराविक अंतराने होते म्हणजेच जेव्हा आपल्याला मूल्यमापनाची किंवा विद्यार्थ्यांच्या गुणाची औपचारिकपणे नोंद करणे आवश्यक असते तेव्हा संकलित मूल्यमापन केले जाते उदाहरणार्थ वर्ष अखेरीची परीक्षा किंवा सत्रा अखेरची परीक्षा.

संकलित मूल्यमापन हे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान औपचारिक निकषांवर आधारित असते तरीही प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता मोजण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी संकलित मूल्यमापनाचा वापर केला जातो.

विषयाच्या किंवा आशयाच्या सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच वर्षा अखेरीस विद्यार्थ्यांना श्रेणी प्रदान करण्यासाठी किंवा त्यांना त्यांची शिकलेल्या विषयासंदर्भातील एकूण प्रगती समजून देण्यासाठी संकलित मूल्यमापन मदत करते.

शिक्षक संकलित मूल्यमापनाचा वापर विद्यार्थ्यांना श्रेणी प्रदान करण्यासाठी किंवा पुढील टप्प्यामध्ये अध्ययन अजून प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांची पुढच्या वर्गात पदोन्नती करण्यासाठी वापर करतात.

संकलित मूल्यमापन हे विषय संदर्भातील ध्येय व उद्दिष्ट गाठली आहेत की नाही हे दर्शवण्याची तसेच बेंच मार्क (विशिष्ट पद्धतीतील कमीत कमी आवश्यक कार्यमान) पर्यंत विद्यार्थी पोहोचला आहे का नाही हे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.

संकलित मूल्यमापन कशा प्रकारे होणार आहे या सगळ्यांची ओळख विद्यार्थ्यांना विषय शिकवण्याच्या आधीच करून देणे आवश्यक असते. संकलित मूल्यमापन ही अध्यापनाच्या पूर्ण प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया असल्यामुळे यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षक वैयक्तिक रित्या अभिप्राय / प्रत्याभरण देऊ शकत नाही. संकलित मूल्यमापन हे शिकवलेल्या पूर्ण विषयावर आधारित असते.

No comments:

Post a Comment