शिक्षणामध्ये
एक प्रभावी मूल्यमापन प्रक्रिया राबवायची असल्यास सर्व प्रकारच्या मूल्यमापन
पद्धतींचा वापर करणे आवश्यक असल्याचे दिसून येते. शारीरिक सुदृढतेच्या कसोट्या, कौशल्य कसोट्या यांचा वापर करून अकारिक मुल्यमापन, संकलित मुल्यमापन, कृती मूल्यमापन,
परिणाम मूल्यमापन या सर्व मूल्यमापन प्रक्रियांचा अंतर्भाव करून विद्यार्थ्यांचे
कौशल्य, आरोग्य, सुदृढता म्हणजेच
शारीरिक शिक्षणातील विविध पैलूंचे मूल्यमापन सर्वांकष पद्धतीने झाले पाहिजे.
परंतु
या सर्व बाबींसोबतच एक महत्त्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षण शिक्षकाला असलेले
मूल्यमापन पद्धतीचे ज्ञान व तो कशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने या मूल्यमापन
प्रक्रियेचा अवलंबन करतो यावर या मूल्यमापन प्रक्रियेच्या प्रभावीपणा ठरतो.
शारीरिक
शिक्षणातील मूल्यमापन प्रक्रिया ही विशिष्ट तत्त्वांवर अवलंबून असते. प्रत्येक
शारीरिक शिक्षकाने या तत्त्वांचा वापर केल्यास मूल्यमापन प्रक्रिया सहज व सोपी
होतेच पण त्याबरोबर ती प्रभावीपणे राबविण्यात सुद्धा मदत होते.
मूल्यमापनाची
तत्वे ही शारीरिक शिक्षण शिक्षकाला मूल्यमापन प्रक्रिया विशिष्ट उद्देशानुसार तसेच
एक क्रमप्राप्त स्वरूपात राबवण्यास मदत करतात.
1. उद्दिष्टे प्रस्थापीत करणे:
जोपर्यंत
महत्त्वाची उद्दिष्टे आणि दिशा ठरवल्या जात नाहीत तोपर्यंत शारीरिक शिक्षणात
मूल्यमापनाचे स्थान निश्चित केले जाऊ शकत नाही.
उद्दिष्टे
शिकण्याचे परिणाम साध्य करतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून
कार्य करतात. उद्दिष्टे महत्वाची आहेत आणि अध्यापन/अध्ययन प्रक्रिया प्रभावी
बनवतात. ते शिक्षकांना काय शिकवायचे हे जाणून घेण्यास आणि विद्यार्थ्याला काय
शिकायचे आणि साध्य करायचे हे जाणून घेण्यास मदत करते.
मूल्यमापनाची
दिशा स्पष्ट करण्यासाठी, अध्यापन व अध्यायनातील बदल ओळखण्यासाठी
आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अर्थ लावण्यासाठी उद्दिष्टांचे विश्लेषण विशिष्ट
परिणामांमध्ये केले जाणे आवश्यक आहे जे सहसा ज्ञान किंवा वर्तन क्षमतेच्या संदर्भात मांडले जातात.
2. मूल्यांकनाची प्रक्रिया निश्चित करणे:
केवळ
चाचण्या घेणे आणि मोजमाप नोंदवणे (स्कोअर) हे मूल्यांकनाचा शेवट नाही. ज्या
उद्दिष्टांसाठी मूल्यमापनाची योजना आखण्यात आली होती ती उद्दिष्टे पूर्ण
करण्यासाठी मूल्यमापनाची प्रक्रिया निश्चित करणे ही शारीरिक शिक्षकाची पहिली
जबाबदारी आहे.
3. प्रक्रिया स्थापित करणे:
शारीरिक
शिक्षणाने त्याच्या प्रक्रियेचे नियोजन केले पाहिजे जेणेकरून उद्दिष्टांमधून प्रकट
झालेली मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतील. प्रक्रिया विकास 2 गोष्टींच्या प्रकाशात होतो: उत्पादनाच्या गरजा ज्या निर्धारित केल्या
आहेत आणि संदर्भ बिंदू (लक्ष्ये) स्थापित केले आहेत. मापन तंत्र प्रक्रियेच्या
प्रक्रियेशी जवळून संबंधित आहे. किंबहुना, व्यापकपणे
सांगायचे तर, ही त्यापैकी एक प्रक्रिया आहे. इच्छित उत्पादन
साध्य करण्यासाठी प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी मापन अपरिहार्य आहे; ते त्या उत्पादनाची स्थिती आणि प्रगती ठरवण्यासाठी देखील अपरिहार्य आहे.
प्रभावी मूल्यमापन अपेक्षित असल्यास चांगली प्रक्रिया आवश्यक आहे.
4. कृती मूल्यमापन आणि परिणाम मूल्यमापन या दोन्ही मार्फत माहिती गोळा करणे:
मूल्यमापन
प्रक्रियेमध्ये कोणतीही कसोटी राबवताना व त्या मार्फत कोणतीही माहिती मिळवताना
म्हणजेच मापन मिळवताना कृती मूल्यमापन व परिणाम मूल्यमापन हे दोन्हीही एकदम
प्रभावी मानले जाणारे जाणारी तंत्रे आहेत. याचाच अर्थ असा की जेव्हा जेव्हा
आपल्याला गुणात्मक रित्या किंवा संख्यात्मकरीत्या माहिती हवी असल्यास आपल्याला या
दोन्ही तंत्राचा म्हणजेच परिणाम मूल्यमापन व प्रति मूल्यमापनाचा वापर करावा लागतो.
5. व्यक्तिनिष्ठ
मापन:
मूल्यमापन
करताना
नेहमी
वस्तुनिष्ठ
कसोट्यांचाच
वापर
केला
पाहिजे
असा
बऱ्याच
जणांमध्ये
एक
समज
असतो. परंतु बऱ्याच
वेळा
वस्तुनिष्ठ
कसोट्यांपेक्षाही
व्यक्तीनिष्ठ
कसोट्यांचा
वापर
करून
केलेले
मूल्यमापन
अधिक
सरस
ठरू
शकते. म्हणूनच मूल्यमापन
करताना
वस्तुनिष्ठ
कसोट्यांबरोबरच
व्यक्तीनिष्ठ
कसोट्याही
वापरल्या
पाहिजेत. मूल्यमापन
करताना
जर
आपण
वस्तुनिष्ठ
व
व्यक्तीनिष्ठ
या
दोन्ही
पद्धतींचा
समावेश
करून
मूल्यमापन
केल्यास
मूल्यमापन
प्रक्रिया
अधिक
प्रभावी
ठरण्यास
मदत
होते
व
मूल्यमापनाची
विश्वासार्हता
वाढते.
6. तज्ञ व्यक्तींमार्फत कसोटीचे व्यवस्थापन
मूल्यमापन प्रक्रिया राबवत असताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राबवलेल्या कसोटीमार्फत चांगल्या दर्जाच्या माहितीची नोंद करून घेणे. याचाच अर्थ असा की चांगल्या दर्जाची माहिती मिळवायची असल्यास ज्या व्यक्तींना मूल्यमापन प्रक्रियेचा अनुभव आहे किंवा ते या प्रक्रियेमध्ये जाणकार/ ज्ञानी आहेत अशा व्यक्तींमार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करून घेणे महत्त्वाचे ठरते.
जेव्हा विद्यार्थी संख्या किंवा कसोट्यांची संख्या जास्त असते व मूल्यमापन प्रक्रिया कदाचित जास्त वेळ खाऊ होऊ शकते अशा वेळेस तज्ञ लोकांची मदत घेतल्यास चांगल्या दर्जा आणि मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करता येते.
i. सहाय्यक व्यक्तींना कसोटीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्यांची अचूक माहिती असणे आवश्यक आहे
ii. कसोट्यांची गुणदान कशा पद्धतीत आहे व त्याचे अचूक नोंद कशी करावी याचे ज्ञान अशा व्यक्तींना असणे गरजेचे आहे.
iii. तज्ञ व्यक्तीं मध्ये परिणाम व कृती मूल्यमापन दोन्ही पद्धतीत मूल्यमापन प्रक्रिया राबवण्यामध्ये सहजता असली पाहिजे.
iv. सहाय्यक व्यक्तींना मानकांवर आधारित किंवा निकषांवर आधारित मूल्यमापन कशा पद्धतीने करावे याचे सुद्धा अचूक ज्ञान असणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment