स्व: आणि सहका-याचे मुल्यमापन
ब-याच वेळा पारंपारिक मूल्यमापनाला बाजूला
ठेवून इतर पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते ज्यालाच आपण Authentic Evaluation म्हणजेच सत्य मूल्यमापन असे म्हणतो.
अशा प्रकारच्या मूल्यमापनामध्ये गटचर्चा, प्रकल्प, प्रदर्शन , मुलाखत इत्यादी बाबींचा समावेश होतो. अशा सर्व बाबींचे मूल्यमापन करत असताना एक प्रभावी मूल्यमापन पद्धत म्हणून स्व: आणि सहका-याचे मूल्यमापन वापरले जाते.
जेव्हा विद्यार्थी स्वतः मूल्यमापन
प्रक्रियेत सहभागी झालेले असतात तेव्हा गटकार्य अधिक यशस्वी होऊ शकते. अशा
प्रकारची मूल्यमापन पद्धती राबवत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्यमापनाचे
निकष व्यवस्थित समजावून देणे व मूल्यमापन निकष प्रस्थापित करत असताना
विद्यार्थ्यांशी सल्ला मसलत करणे आवश्यक असते.
विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने मूल्यमापन
करत असताना सर्व विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे तसेच विविध पैलूंचे चांगल्या दर्जाने
मूल्यमापन होईल अशा पद्धतीने निकष ठरवणे गरजेचे असते.
स्व: आणि सहका-याचे मुल्यमापनाचे मुख्य उद्दिष्टे:
विद्यार्थ्यांची गटकार्य करत असतानाची
स्वतःची जबाबदारी व स्वायत्तता वाढवण्यासाठी या प्रकारच्या मूल्यमापनाचे महत्त्व
जास्त असते.
मूल्यमापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी स्वतः
अंतर्भूत असल्या कारणाने विषय कौशल्य आणि प्रक्रिया अधिक प्रगतपणे आणि सखोलपणे
समजून घेण्यासाठी विद्यार्थी सतत प्रयत्न करत असताना दिसतात.
विद्यार्थी गटचर्चा मध्ये व्यवस्थित सहभागी
होतात व गटचर्चा दरम्यान गांभीर्याने चिंतनात सामील होतात.
विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या विषय किंवा आशयाच्या समजून घेण्याच्या पद्धतीची व निर्णय घेण्याची चांगली समज विकसित होते.
विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान किती चांगले आहे किंवा ते कोणत्या
आशयामध्ये कमी पडतात याबद्दल त्यांना जाणीव होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना
अभ्यासामध्ये नक्की कुठल्या आशयावर जास्त लक्ष केंद्रित करायची गरज आहे तसेच जी
काही उद्दिष्टे ते स्वतःसाठी तयार करतात ती वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न करतात.
सहकार्याचे मूल्यमापन करताना गटामधील सर्व
विद्यार्थ्यांना मूल्यमापनाची प्रक्रिया व निकष आधीच समजावलेले असतात. गटातील
सर्वच विद्यार्थी एकमेकांना गुणदान करतात व सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी
करून प्रत्येक विद्यार्थ्याला गुण दिले जातात.
स्व: आणि सहका-याचे मुल्यमापनाचे फायदे:
· गटामधील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाचे गुणदान करत
असल्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया निष्पक्षपातीपणे पूर्ण होण्यास मदत होते.
·
विद्यार्थी मूल्यमापनामध्ये जबाबदारीने सहभागी होतो व व
गांभीर्याने मूल्यमापन करतो.
· विद्यार्थी स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करत असल्यामुळे
त्याला स्वतःतील कमतरता व ज्या आशयामध्ये त्याचे प्रभुत्व आहे अशा बाबी समजून घेण्यास
मदत होते.
·
मूल्यमापनाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तो प्रोत्साहितपणे
हे कार्य पूर्ण करतो.
· विद्यार्थ्यांना
त्यांची भूमिका आणि समूह कार्य प्रक्रियेतील योगदान यावर चिंतन करण्यास
प्रोत्साहित करते.
· अशा
प्रकारचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना सहजपणे मान्य होते कारण सर्व मूल्यमापन
प्रक्रिया ही त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या सहका-याने मिळून पूर्ण केलेली असते.
· काही
विद्यार्थी जे काम करण्यास टाळाटाळ करतात अशा विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीला आणा
बसतो कारण त्यांनी माहीत असते आपल्या कार्यमानाचे हे आपल्या सहकारी
विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन केले जाणार आहे.
स्व: आणि सहका-याचे मुल्यमापनाचे तोटे:
· या
प्रकारचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांना पूर्ण निकष समजून देणे तसेच मूल्यमापनाची
प्रक्रिया समजावून देणे यामध्ये शिक्षकाचा भरपूर वेळ खर्च होतो त्यामुळे कदाचित
लेक्चररचा वर्कलोड वाढू शकतो.
· या
मूल्यमापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी पूर्णतः समाविष्ट असल्यामुळे कदाचित या
मूल्यमापनाच्या विश्वसहार्यतेच्या संदर्भात काही प्रमाणात जोखीम असू शकते कारण कधी
कधी विद्यार्थी स्वतःच्या मित्राला किंवा जवळच्या सहकाऱ्याला जास्त गुणदान करू
शकतात.
· कदाचित
विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांना समान गुण देण्याकडे कल असू शकतो.
· काही
विद्यार्थी वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या दबावाखाली असल्यास ते त्यांना योग्य
प्रकारे किंवा कमी गुणदान करण्यास घाबरू शकतात किंवा त्यांचा गोंधळ उडू शकतो.
· मूल्यमापन
प्रक्रियेत विशिष्ट गट तयार झाल्यास ते विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे गुणदान
मुद्दाम कमी करू शकतात किंवा स्वतःच्या मित्रांना जास्त गुणदान देऊ शकतात
स्वमूल्यमापन व सहकार्याच्या मूल्यमापन या
प्रक्रियेमध्ये जरी वेळ जास्त जात असेल किंवा शिक्षकाला मूल्यमापन प्रक्रियेचा भार
वाढत असेल तरीही आशयातील एखाद्या तरी घटकासाठी शिक्षकाने अशा प्रकारच्या मूल्यमापन
प्रक्रियेचा वापर केला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना मूल्यमापन प्रक्रिया
समजण्यास, त्याची
गांभीर्याने दखल घेण्यास व स्वतःच्या कौशल्यांच्या /आशयाच्या ज्ञानाच्या
दर्जाबद्दल तो चिंतन करू शकतो आणि उपाययोजना राबवून त्यामध्ये तो प्राविण्य
संपादित करू शकतो.
स्व: मुल्यमापनाचा नमुना
सहका-याच्या मुल्यमापनाचा नमुना
No comments:
Post a Comment